स्त्री पुरुष तुलना
₹100.00 ₹20.00
Description
ताराबाईंनी आपल्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात विधवा-विवाहास उच्चवर्णीयांनी केलेली मनाई, तिचे हाल, शिक्षण नसल्याने स्त्रीची होणारी कुचंबणा त्यांच्या भोवताच्या परिस्थितीत त्या बघत होत्या. परंपरेने रूढी संस्कृतीने स्त्रियांना कुटुंबात दिलेले गौण स्थान, सर्व बंधने स्त्रीवर घालण्याची पद्धत, पुरुषांना गरजेपेक्षा दिलेले महत्त्व ताराबाईना पटत नव्हते. त्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटनेने त्यांना प्रेरणा मिळाली. १८८१ सालच्या मे महिन्यात टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात एक बातमी छापून अली होती. सुरतमधील विजयालक्ष्मी या विधवेने समाजाच्या भीतीने तिच्या मुलाची हत्या केल्याने तिच्या विरोधात दाखल झालेल्या खटल्याची ही बातमी होती.विजयालक्ष्मी या तरुण विधवेवर खटला भरला गेला होता. तिला शिक्षा झाली होती. खटल्याविषयी ताराबाईनी वृत्तातून वाचले. त्याच्या अनुषंगाने ‘पुणे वैभव’ या तत्कालीन सनातनी वृत्तपत्रात एक लेख आला होता. त्याला प्रतिसाद म्हणून १८८२ साली ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री पुरुष तुलना’ हा निबंध लिहिला होता.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.