Welcome to Saptarshee Prakashan Online Book Shop!
Sale

Shabdshivar Diwali Ank 2020

39.00200.00

Clear
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

‘शब्दशिवार’

हा विविध साहित्य प्रकारातील कलाकृतींनी नटलेला वैविध्यपूर्ण असा दीपावली अंक आपल्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लिहित्या हातांचे प्रतिनिधित्व करणारा यमूल्य आणि प्रतिभा सौंदर्याने बहरलेला असा हा वैशिष्ट्यपूर्ण अंक आपल्या सर्व कवी, लेखकांच्या प्रतिभा सामर्थ्याची आणि शब्दसोबत्यांच्या सहकार्याची फलश्रुतीच आहे.
सन 2020 हे वर्ष केवळ भारतवर्षातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये कोरोना महामारीचे अरिष्ट घेऊन आले. 22 मार्च च्या जनता कर्फ्यू पासून देशात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर झाले आणि संपूर्ण समाजजीवनच थांबते झाले. शाळा-महाविद्यालये, देवालये, सिनेमागृहे, कार्यालये, दुकाने बंद झाली. उद्योग-व्यवसाय बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले. उद्योग बुडाले. हातावर पोट असणाऱ्या जिवांना उपासमारीला सामोरे जावे लागले. कोरोनापासून बचावासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग बाबतीत प्रबोधन होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. डॉक्टर, नर्स, पोलीस, प्रशासन, सर्वेक्षण करणारे शिक्षक आदि देवदूतासारखे समाजरक्षणासाठी अर्थात मानव जातीच्या जीवित रक्षणासाठी पुढे सरसावले आणि भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या खंडप्राय देशाने कोरोना महामारी विरुद्ध निकराचा लढा दिला. आपण टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कडून अनलॉककडे प्रवास करीत या महामारीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले.
अशा प्रतिकूल परिस्थितीत सारी मानव जातच अगतिक झाली असताना, सण-समारंभ रद्द झाले असतानाही लोकांचे प्रबोधन करण्याचे कार्य आपल्या कथा, कविता, चारोळ्या, लेख, कादंबऱ्यातून कवी लेखकानी केले आणि एक प्रकारे लोकांना मानसिक आधार देण्याचे, प्रबोधन करण्याचेच शिवधनुष्य त्यांनी पेलले. शब्दशिवार दीपावली अंकासाठी अनमोल असे विचारधन पाठवून कवी लेखकांनी आम्हांला हार्दिक सहकार्य केले आणि त्याचाच परिपाक म्हणजे आपला हा सुंदर बहुरंगी शब्दशिवार दीपावली अंक होय. जे समाजहितकारक आहे तेच खरे साहित्य! साहित्य लोकांना जगायला शिकवते उमेद निर्माण करते. प्रबोधन व मनोरंजन करून आपला ताण -तणाव हलका करते.आमचा हा वैविध्यपूर्ण अंक निश्चितपणे आपणास आवडेल अशी आम्हांस खात्री आहे.

Additional information

Language

Marathi

RNI No

MAH MAR 2016/70906

EDITOR:

ADV KUMUDINEE GHULE

Publication

Saptarshee Publication

Book type

ebook, Paperback, Audiobook

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart