BUDHABHUSHANAM
₹50.00 ₹10.00
Description
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे हे प्रतिभासंपन्न छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. लहानपणीच कवी कलश,महाकवी भूषण,गागाभट्ट यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने तसेच आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानितीशास्त्रपर रचला असावा.ग्रंथाचा सुरुवातीला शहाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे यांची स्तुती आहे.एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती,राज्य व्यवस्था,कर्तव्ये,मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत.छत्रपती संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या.त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे,ब्रज भाषेतील सातसतक,नखशिख,नायिकाभेद हे ग्रंथ उपलब्ध आहेत.श्रुंगारपुरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी श्री सखी राज्ञी जयती महाराणी छ.येसुबाईसाहेब यांच्या प्रेरणेने त्यांनी ‘नखशिखा’ हा ग्रंथ लिहिला. मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला.स्वराज्याचे हे दुसरे अभिषिक्त छत्रपती मराठीसह संस्कृत,फारसी,उर्दु,अरबी,ब्रज, इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते.इंग्रजीतुन त्यांनी अनेकदा फिरंग्यांशी बोलणी व पत्रव्यवहार केला.अतिशय हुशार,कर्तबगार,दुरदरषी,अनेक विद्या व कलांचे अधीपती व सर्वगुणसंपन्न असेच धाकल्या छत्रपतींचे व्यक्तिमत्त्व होते.या ग्रंथाची निर्मिती शंभूराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी केली.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.