Anandi Anand
₹130.00 ₹120.00
प्रकाश परसवाळे हे आपला ‘आनंदीआनंद’ हा पहिला बालकवितासंग्रह घेऊन बालवाचकांच्या भेटीसाठी आले आहेत. ह्या संग्रहात बालकांच्या भावविश्वाशी संबंधित सगळे विषय आले आहेत. बालकांचे जग हे अद्भुतरम्यतेने आणि कल्पनाशीलतेने भरलेले असते. त्यानुसार ह्या कवितेत प्राण्यांची सभा भरली आहे. कावळ्यांची शाळा भरली आहे. या शाळेत खडू नाही ना फळा नाही. फळांची सभा भरते आणि त्या सभेत फळांचा राजा कोणी व्हायचे याचा निर्णय एकमताने घेतला जातो. हा लोकशाहीचा नमुना आहे. प्राण्यांचा संदल निघाला आहे. ह्या माध्यमातून सर्वधर्मसमतेचा संदेश दिला आहे. सिंहाच्या छाव्याच्या बारशाचा कार्यक्रम दणक्यात साजरा होतो आहे. बालजगतात कधीकधी पशुपक्ष्यांचे कविसंमेलनही होते. भुंगा आपल्या गुणगुणण्यातून आगळीवेगळी धून आळवतो. नैसर्गिक संगीत निर्माण करतो. चिऊताई, खारूताई, ससा, कोंबडा, मनीमाऊ, भूभू, वानर हे सगळे वेगवेगळ्या स्वभावाचे बालमित्र आपल्याला ह्या कवितेत भेटतात. चांदोमामा हा तर सगळ्या जगाचा मामा. ढवळ्या पवळ्याची जोडी शेतात राबून माणिकमोती पिकविते. श्रममेव जयतेचा हा संदेश आहे. पशुपक्ष्यांच्या माध्यमातून मानवी भावभावनांचे सगळे रंजक खेळ इथे रंगले आहेत. परसवाळे यांच्या बालकवितेत साजिरा गोजिरा निसर्ग साक्षात झाला आहे. हिरवीगार शेते आणि झुळझुळणारे झरे अतिशय मोहक आहेत. निसर्गाने रंगविलेले रान पाहून आपले भान हरपते. अल्लड वारं, पिसाट वारं अशी वा-याची नानाविध रूपे इथे आपल्याला भेटतात. ढगाला तहान लागते आणि तो सागर पिऊन ढेकर देतो. आहे की नाही मज्जा !
डॉ. सुरेश सावंत
Reviews
There are no reviews yet.