Welcome to Saptarshee Prakashan Online Book Shop!
-60%

संत कान्होपात्रा

50.00 20.00

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

संगीत नाटक….

संत कान्होपात्रा …

“नको देवराया अंत आता पाहु।
प्राण हा सर्वता जावू पाहे।।
हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले।
मजलागी जाहले तैसे देवा।।
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी।
धावे वो जननी विठाबाई।।
मोकलूनी आस झाले मी उदास।
घेई कान्होपात्रेस हृदयास।।”

संत कान्होपात्रा यांची ही रचना फार प्रसिध्द आणि सर्वश्रृत आहे.या रचनेप्रमाणेच त्यांच्या अनेक स्वरचित रचना होत्या पण त्यावेळी त्या योग्य तऱ्हेने जतन न झाल्यामुळे, कोणी लिहुन न ठेवल्यामुळे आज आपल्याला त्यांच्या फार थोडया रचना पहावयाला आणि ऐकावयाला मिळतात.
कान्होपात्रा या वारकरी संप्रदायातील इ.स. १५व्या शतकातील एक प्रमुख संत कवयित्री होउन गेल्या.
संत कान्होपात्रा यांचा जन्म पंढरपुर जवळ मंगळवेढा या गावी एका गणिकेच्या पोटी झाला. शामा या नाचगाणं करणाऱ्या गणिकेकडे अनेक प्रतिष्ठीतांचे येणे जाणे होते.
अनेक धनदांडग्यांना मुस्लिम सरदारांना, अमिर उमरावांना खुश करण्याचे काम ही शामा नायकीण करीत असे. तीची ही किर्ती दुरवर पसरल्यामुळे लांबुन लांबुन श्रीमंत धनवान मंगळवेढयास या शामा गणिकेच्या घरी भेटी देत असत.
अश्या या शामा नर्तिकेच्या पोटी सुरेख अशी कन्या जन्माला आली. जणु चिखलात कमळ उमलले. तीचे नाव कान्होपात्रा असे ठेवले चंद्राच्या कलेप्रमाणे कान्होपात्रा हळुहळु मोठी झाली अप्रतीम लावण्य आणि गोड गळा यामुळे कान्होपात्राने आपल्याप्रमाणे व्यवसाय करून श्रीमंत आणि धनवान मंडळींना खुश ठेवावे अशी तिची आई शामाची ईच्छा होती.
पण पुर्वपुण्याईमुळे कान्होपात्रेला लहानपणापासुनच विठ्ठलाच्या भक्तिची ओढ होती. गावातील वारकऱ्यासमवेत ती पंढरपुरी जात असे त्यामुळे आईचा व्यवसाय पुढे न्यावा असे विचार तिच्या मनाला कधी शिवले देखील नाहीत.
या वारीत कान्होपात्रेला संतसंग लाभला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माउलींची भेट झाली आणि त्यांचा सहवास लाभला. या संत संगतीमुळे ती पुरती बदलली आणि तिच्या आयुष्यात सुध्दा आमुलाग्र बदल घडला. सतत हरिनामात दंग राहाणे आणि किर्तन करणे या तिच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी झाल्या.
बिदरच्या बादशहापर्यंत कान्होपात्रेच्या सौंदर्याची ख्याती पोहचली. तिला पकडुन आणण्याकरता त्याने आपले सरदार मंगळवेढयास पाठविले. स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्याकरता कान्होपात्रा वेश बदलुन वारीत सहभागी झाली आणि पंढरपुरी पोहोचली विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवुन आपले रक्षण करण्याची आर्त विनवणी तीने केली.
बादशहाच्या सरदारांनी तिचा पंढरपुराच्या मंदिरापर्यंत पाठलाग केला. मंदीराच्या व्यवस्थापकांना कान्होपात्रेला हवाली करण्यास फर्मावले अन्यथा मंदीर उध्वस्त करण्याची धमकी दिली. आपल्या भगवंताचे आपल्या विठ्ठलाचे मंदिर उध्वस्त होतांना कान्होपात्रा कशी पाहु शकणार होती तीने यवनांसोबत जाण्याची तयारी दर्शविली परंतु शेवटचे विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवण्याची विनंती केली.
विठ्ठलाच्या पायाला कडकडुन मिठी मारून तिने आपले प्राण त्याक्षणी त्यागले पण आपल्या आणि पांडुरंगाच्या भक्तित अडसर ठरू पाहणाऱ्या यवनांसोबत गेली नाहीच अशा या महान संत कवयित्रीचे स्मारक तरटी वृक्षाच्या स्वरूपात विठ्ठल मंदिरात आजही तिच्या भक्तीची साक्ष देत उभे आहे.

 

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart