शब्दशिवार दिवाळी अंक 2021
₹100.00
शब्दशिवार दिवाळी अंक – २०२१
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना या डिजिटल संस्कृतीच्या काळात आपल्या समोर अनेक आव्हाने आहेत. या पासून वाचनसंस्कृती व साहित्य परंपराही कशी अलिप्त राहू शकेल? तरीही या आव्हानांना पेलून आपण मार्ग काढतच आहोत व सकारात्मक रित्या समाधानाने वाटचाल करत आहोत व खरे तर यातच सुख आहे. शंभर वर्षापेक्षा अधिक वर्षे सुरु असलेल्या दिवाळी अंकांच्या प्रवासात अनेक लेखक दिवाळी अंकांमधून पुढे आले आहेत. अनेक प्रतिथयश कवींनी दिवाळी अंकांच्या पानांमधून आपले अस्तित्व सिध्द केलेले आहे. दिवाळी अंकाच्या परंपरेत मी असे दिवाळी अंक वाचले आहेत कि वर्षानुवर्ष तेच प्रतिथयश लेखक घेऊन दिवाळी अंक छापतात. अर्थात अंक दर्जेदार असतोच. परंतु सप्तर्षी प्रकाशनाच्या मागील काही दिवाळी अंकाकडे पाहिले तर आपल्याला असे दिसून येईल की त्यात वैविध्य येते आहे. मागील वर्षी आपण कथा- दिवाळी विशेषांक काढला होता. नवोदित लेखकांना एक उत्तम व्यासपीठ या दिवाळी अंकाच्या माध्यमातून मिळत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातल्या साहित्यिकानी या अंकासाठी लेखन पाठवले आहे. दरवर्षी त्याच लेखकांना न घेता लेखनाच्या वैविध्यपूर्ण आशयानुसार निवड केली आहे. खरंतर दिवाळी अंक हा बौद्धीक फराळ पुरवणारी रसिक वाचकांसाठीची मेजवाणी असते. थोडासा खुसखुशीतपणा, थोडा खमंग, थोडा चुरचुरीतपणा व तिखट गोड पणा फराळात हवा तसा यात रसिक वाचकासाठी मनोरंजनात्मक, वैचारिक, कौटुंबिक व अगदी हलकं-फुलकं सहजसोपं असं लोंकाना समजेल असं साहित्य असावं असं मला नेहमी वाटायचं. खरंतर मी असं संपादकीय लिहिण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. माझा अनुभव ही दांडगा नाहीये. परंतु सप्तर्षी प्रकाशनाशी असलेला स्नेह व जुळलेले साहित्यिक स्नेहबंध यातून लेखनासाठी नेहमीच सकारात्मक उर्जा मिळत गेली.
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ॥ जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥
संत ज्ञानेश्वरांनी पसायदान रूपी प्रार्थना लिहून मानवजातीच्या कल्याणासाठी एक मोठा संदेश रुजवला आहे. माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. करोना काळातील संकटाचे सावट आता दूर होत आहे आणि आता आपण आता सकारात्मकतने पाऊले उचलायला हवीत.
सप्तर्षी प्रकाशनाचा प्रकाशन प्रवास वरचेवर अतीशय दर्जेदार होत आहे. विविध लेखक अतीशय जोमाने सप्तर्षी प्रकाशनातून लेखन करत आहेत. प्रकाशन व्यवसाय व दिवाळी अंकाची श्रृखंला जोपासत आहे. मागील दोन वर्षांपासून करोनाचं संकट आपल्या डोक्यावर टांगत्या तलवारी प्रमाणे लटकत आहे. तरीही तग धरून न डगमगता आपण अतीशय संयमाने या सर्व परिस्थितीचा सामना करत आहोत. लिहित आहोत, वाचत आहोत. आपल्या संवेदना आपल्या प्रतिभेच्या व निर्मितीच्या पातळीवर संवेदना जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामागील साहित्यिक प्रेरणा वा जाणिवांची भूमिका खूप मोठी आहे. संवेदना व भावना माणसातील जर मृत पावल्या तर तो माणूस कसला. जर जीवन जाणिवा समृध्द झाल्या नाहीत तर जगणं कसं समृध्द होणार. आपल्या सप्तर्षीच्या या दिवाळी अंकाकडे पाहिले तर आपल्याला दिसून येईल कि अनेक या पिढीतील उभरत्या व नामवंत लेखकांनी या अंकातून लेखन केले आहे. दिवाळी अंकांचा व्याप सांभाळणे सोपे नाही, त्यातून मिळणारे उत्पन्नही कमीच असते. असे असूनही मराठीत दरवर्षी बरेचसे दिवाळी अंक निघतात. दिवाळी अंकांसारख्या बौद्धिक खुराकाची गरज आपण अधोरिखित केली तर दिवाळी संपल्यावरही मराठी घरात ती पुढचे सहा महिने टिकून राहते ती दिवाळी अंकांच्या स्वरुपात, हा लौकिक ही परंपरा आपण जपली पाहिजे. तुम्हाला सर्वांना हा दिवाळी अंक नक्कीच आवडेल. आपल्या सर्वांना दीपवालीच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी एवढेच म्हणेन,
चला आला सण वर्षाचा दिवाळी, साज चढला कमानी, घर खिडक्या सजल्या रंगी बेरंगी दिव्यांनी गाव देऊळे राऊळे वेस शाळा पताक्यांनी, जागोजागी भरलेली दुकाने ही कंदिलानी, सडा शिंपण रांगोळी तेवे दिप वृंदावनी, झेंडू फुलांचे तोरण दिसे दाराला शोभुनी
गंध उटण्यांचा देही चढे पापण्यांना ग्लानी, गोड तिखट फराळ रोज पहाटे खाऊनी, घरदार उजळते लक्ष्मीच्या पावलांनी, पाडव्याला ओवळते घर धन्यास हौसेनी दिवे कणकीचे दोन टिळा कपाळी लावुनी, करी औक्षण बहीण बंधु राया ओवाळूनी करू हौसमौज वाटू सुखदुःख आनंदानी, सण साजरा करूया हेवेदावे विसरूनी….
Description
- drशब्दशिवार दिवाळी अंक – २०२१

संपादक
Additional information
Book Author | संपादक कुमुदिनी सिद्धेश्वर घुले |
---|
1 review for शब्दशिवार दिवाळी अंक 2021
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Super Admin (verified owner) –
दिवाळी अंक २०२१