Welcome to Saptarshee Prakashan Online Book Shop!
-80%

शब्दशिवार दिवाळी अंक २०२२

100.00 20.00

मुखपृष्ठाविषयी….

एखादी सुंदर लावण्यवती ,देखणी स्त्री दिसली,की तो वेड्यासारखा तिच्या मागे जाई व कसलीच भिती न बाळगता “तू जशी आहेस तशीच थांब”अशी विनंती करत भर रस्त्यात,मंदिरात,राजमहालात, काळ स्थळाची भान न बाळगता जिथे भेटेल तिथे त्या सुंदर स्त्रीचे तो मनमोहक चिञ चीतारण्यात गुंग होई, कारण त्याची कलेविषयी शुद्ध आणि कलासक्त भावना होती..!
त्या सुंदर लावण्यवती कडे तो वासनेच्या दृष्टीने न पाहता तसे कोणतेच प्रयत्न करत नसे. तर आपल्या चिञकलेच्या अविष्काराने त्या सुंदर स्त्रीला लाजवेल अशी तिची हुबेहुब प्रतिकृती तो त्याच्या चिञातून निर्माण करी. अनेक सुंदर स्त्रीया त्या चिञकार राजा रवि वर्मा च्या प्रेमात पडून स्वतःला हरवून गेल्या.राजाच्या दरबारी राजाश्रय प्राप्त होऊन आपली कला रवि वर्मा सादर करीत असे त्याच राजाच्या भावाने रवि वर्मा याला हिन वागणूक दिली तेव्हा त्या राजाने रवि वर्मा याला “राजा”म्हणून गौरविले.”अस्सल कलेचा राजा” तेव्हापासून तो “राजा रवि वर्मा” म्हणून ओळखला जाऊ लागला.
स्त्रियांचे सौंदर्य दाखवतानाही राजा रवि वर्मा मर्यादा ओलांडत नाहीत. त्यांच्या चित्रांत कुठेही उत्तानता, अश्लीलता जाणवत नाही. रेशमी वस्त्र रंगविताना त्यांचा सुळसुळीत स्पर्श डोळ्यांना जाणवतो. अलंकार रंगविण्याचे कौशल्य आणि सर्व स्तरातील स्त्रियांचे चेहऱ्यावरील भावदर्शन अप्रतिम. अर्जुन आणि सुभद्रा या चित्रात अर्जुन सुभद्रेला कवेत घेत आहे. या प्रसंगात अर्जुनाच्या चेहऱ्यावरील प्रणयोत्सुक भाव आणि सुभद्रेची अवघडून गेलेली अवस्था आणि चेहऱ्यावरील लज्जा किती सहजपणे त्यांनी व्यक्त केली आहे. शब्दशिवार २०२२ या नवव्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ लाल नऊवारी साडीतील सुंदर मराठी स्त्री असून राजा रवी वर्मा यांची एक अजोड आणि उत्कृष्ट कलाकृती आहे…!
www.saptarshee.in
mob.9822702657

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

✍️शब्द शिवार दिवाळी अंक २०२२✍️

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्ष आणि जगभरातील हिंदू कुटुंबामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. प्रत्येक सण, उत्सवावर त्या त्या प्रदेशातील सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा प्रभाव असतो. पण, आपल्या राज्यातील दिवाळी सणाचा एक वेगळाच साहित्यिक पैलू घेऊन पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हा साहित्यिक पैलू म्हणजे दिवाळी अंक!
दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छपाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे.दिवाळी अंकाची दैदिप्यमान परंपरा केवळ मराठी भाषेतच पहायला मिळते असे नाही तर मराठी अभ्युदयाने केलेली सुरुवात इतर बंगाली, गुजराती भाषेतही पहायला मिळत आहे.आधुनिकीकरण आणि बदलत्या काळाबरोबर महाराष्ट्रातील मराठी मनाची साहित्यिक, सांस्कृती भूक आणि वैविध्यपूर्ण मागणी वाढत होती. आणि .ती पूर्ण करताना मराठी प्रकाशक साप्ताहिके, मासिके, पुस्तके आणि दैनंदिन घडामोडींसाठी वृत्तपत्रे प्रयत्न करत होती आजही विविध प्रकाशन संस्थांकडून ८०० हून अधिक दिवाळी अंक ही साहित्यिक भूक भागवण्यासाठी प्रकाशित केले जातात. दिवाळीची सुट्टी आणि आनंदाचे वातावरण सर्व आप्तेष्टांची मित्रमंडळींची भेट यातून होणारी वैचारिक देवाणघेवाण दिवाळी अंकांच्या माध्यमातून अधिक समृद्ध होते.
शिक्षण, पर्यटन, आर्थिक साक्षरता आणि प्रवास यामुळे वाचकांची भूक आणखी वाढली. अनेक प्रकाशकांनी विषयाधारीत अंक छापण्यास सुरुवात केली. कथा, कविता, नाटक, कादंबरी यांसोबतच इतर भाषांमधील लेखकांचे साहित्य, भाषांतरीत कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं दिवाळी अंकात छापून येऊ लागले. आज तर दिवाळी अंकांचे स्वरुप इतके बदलले आहे की, विविध विषय घेऊन प्रकाशक दिवाळी अंक काढतात. जसे की, पर्यटन, राजकारण, ललित, समिक्षा,कृषी, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध वैगेरे वैगेरे. नव्वदच्या दशकात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात मोठी क्रांती झाली आणि अनेक मराठी मुले मुली मोठय़ा संख्येनं आय टी कंपन्यांमध्ये मध्ये नोकरीच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पसरली . इंग्लंड, अमेरिका, युरोपपासून ते सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पर्यंत जगभर मराठी भाषिक मंडळी मोठय़ा प्रमाणावर विस्तारले . या सर्व मंडळींचा एक समान सांस्कृतिक धागा म्हणून डिजिटल परंपरेतून दिवाळी अंक प्रकाशित करण्याची गरज निर्माण झाली. यासाठी आयटी क्षेत्रातील तज्ञ आणि प्रकाशन संस्था यांच्या माध्यमातून असे ई बुक स्वरूपातील दिवाळी अंक प्रकाशित करण्याची संकल्पना पुढे आली. जगभरातल्या मराठी माणसांना जोडणारं डिजिटल रूपात संगणकावर, मोबाइलवर आणि किंडल किंवा टॅब्लेटवर वाचता येणारे दिवाळी अंक, ऑडिओ बुक दिवाळी अंक, व्हिडीओ रूपात संवाद साधणारे दिवाळी अंक अशी परंपराच सुरू झाली. पारंपरिक छापील दिवाळी अंकांचा आनंद घेतानाच नव्या माध्यमातील प्रयत्नांचंही कौतुक होऊ लागलं आणि अशा ऑनलाईन साहित्याची दखल विशेषतः कोरोना कालावधी प्रामुख्याने घेतली गेली.मोठा मराठी वाचक वर्ग या माध्यमाकडे आपसूकच वळला त्यांचीही सांस्कृतिक भूक भागवण्यासाठीच आमच्याही प्रकाशन संस्थेने सन २०१४ मध्ये सप्तर्षी या नावाने पहिला दिवाळी अंक आमच्या www.saptarshee.in या संकेत स्थळावर ऑनलाईन प्रकाशित केला या ऑनलाईन दिवाळी अंकांना मिळणारा प्रतिसाद आणि सर्वदूर पोहोचलेल्या मराठी समूहाची सांस्कृतिक गरज यातून आमच्या प्रकाशनाने शब्दशिवार हे मासिक/नियतकालिक सुरू केले. छापील दिवाळी अंकाच्या मर्यादा आणि व्यावसायिक गणिते लक्षात घेता सर्वसमावेशक ऑनलाइन डिजिटल दिवाळी अंक काळाची गरज बनली आहे. या डिजिटल चळवळीचा भाग म्हणून आम्ही मराठीतील सांस्कृतिक जडणघडणीत खारीचा वाटा म्हणून लिहित्या हातांना संधी देण्यासाठी आवाहन केले त्या अनुषंगाने अत्यंत उत्कृष्ट साहित्य आम्हाला प्राप्त होत आहे. या सर्व साहित्य कृतीतून आमचा सन 2022 दिवाळी अंक संपादित होत आहे. नेहमीप्रमाणे यंदाही वाचक आमच्या या दिवाळी अंकाचे स्वागत करतील यात शंका नाही..!

#शब्दशिवार२०२२

इ दिवाळी अंक…

शब्दशिवाऱ २०२१
मान्यवर लेखकांच्या लेखणीतून….
🔳 कथा
🔳 लेख
🔳 कविता
🔳 आस्वादक साहित्य

आणि बरंच काही….

मराठी साहित्य आणि संस्कृती समृद्ध करणारा वाचनीय शब्दशिवार दिवाळी अंक!

🔳संपादक : ॲड.कुमुदिनी सिद्धेश्वर घुले
🔳संपादन सहाय्य: विनायक आवताडे
🔳मुखपृष्ठ : राजा रविवर्मा
🔳छायाचित्रे: ॲड.संतोष माने
🔳रचना : किशोर घुले, सय्यद शेख
🔳वितरण: सय्यद शेख

◆ वर्ष : नववे । पृष्ठे : ७५

◆ मूल्य : ₹ २२५ प्रति दिवाळी अंक आणि १०० e दिवाळी अंक

 

www.saptarshee.in
saptarshee ebook reader app

◆ संपर्क : ९८२२७०१६५७,९८०४०४७०७७

मराठी साहित्य विश्व समृद्ध करणारा अनेक मान्यवर लेखक-लेखिका, कवी-कवयित्री -अभ्यासकांच्या मांडणीने सजलेला एक दर्जेदार आणि संग्राह्य इ दिवाळी अंक आपल्या आपल्या मोबाईल, टॅब आणि संगणकामध्ये संग्रही असायलाच हवा!

🔳 कथा…
निशा डांगे/नायगावकर,
श्रीनिवास गेडाम,
भूषण तांबे,
अरुण देशपांडे,
जयश्री दाणी,
भारत सोनवणे,
सप्तर्षी माळी,
भारती सावंत,
आरती पद्मावार….

🔳कविता…
संतोष विठ्ठल घसिंग,
सतीश ज्ञानदेव राऊत,
प्रा.देवबा शिवाजी पाटील,
डॉ.विशाल इंगोले,
प्रा.सुमती पवार,
रामकृष्ण पाटील,
तुकाराम खिल्लारे,
गणेश भाकरे,
भगवान निळे ,
राजाराम बनसकर,
किरण डोंगरदिवे,
संदीप पाटोळे,
आशिष निगुडकर,
भारती सावंत,
प्रतिमा इंगोले,
सुनील खोडके,
श्रीनिवास गेडाम,
रत्ना मनवरे,
हेमंत सावळेन

 वसुंधरा सूत्रावे

नरेंद्र नाईक

 

 

 

 

🔳लेख….
सतीश राऊत,
बालाजी धनवे,
डॉ.सदानंद गावडे,
सिद्धेश्वर घुले,
कुमुदिनी घुले
डॉ.क्षमा शेलार,
देवबा पाटील,
भारती दिलीप सावंत,
प्रा.शिवाजी जोगदंड

प्रदीप विश्वंभरराव मरवाळे

 

🔳 आस्वादक साहित्य
किरण डोंगरदिवे,
वर्षा विजय देशपांडे

✍️

 

 

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart