Welcome to Saptarshee Prakashan Online Book Shop!
-75%

राजपुत्र संभाजी

200.00 50.00

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

आमचे मित्र थोर कथाकार श्रीमंत गुणवंतजी पाटील बेळगाव ( कर्नाटक ) यांनी राजे भोसले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर कादंबरी लिहा. नरेंद्र नाईक यांच्या शब्दातील संभाजी महाराजांचे जीवन चरित्र वाचायला आवडेल. अशी सूचना केली होती. या सुचनेचा आदर राखण्याची वेळ जुळून येत नव्हती. कारण जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराजे , शुरवीर योध्दे होऊन गेले पण संभाजी राजा सारखा राजा म्हणून , योध्दा म्हणून , सारस्वत म्हणून , विचार वंत म्हणून , समाज सेवक म्हणून दुर्मिळ. संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रात अनेक ललित लेखकांनी भलते सलते जावाई शोध लावून ठेवले आहेत. त्यामुळे संभाजी महाराजांचे जीवन चरित्र क्रम धरु शकत नव्हते. पण . . . कालपर्वा बाप ललित लिहीत असताना अचानक संभाजी राजे भोसले साद घालू लागले आणि या ऐतिहासिक कादंबरीचा जन्म झाला. कादंबरीचे शिर्षकचं राजपुत्र संभाजी या शब्दा पासून सुरू झाले असले तरी राजपुत्र म्हटला की , एक सुखी जीवनातला सुंदर , मनमस्त देखणा आणि अनेकांना घायाळ करणारा मुखडा असेल असे वाटणे साहजिक आहे , स्वभाविक आहे. कारण राजपुत्र म्हटले की , सर्रास याचं वर्णनाचे असतात. पण . . . हा राजपुत्र थोडा वेगळाच आहे. कारण शिवराय हे सरदार पुत्र असल्याने संयमाची संयत ज्योत त्यांच्या ठायी होती. पण . . . राजे भोसले संभाजी महाराज साहेब हे राजपुत्र असल्याने वादळ वाऱ्यातला साक्षात धडाधडा पेटणारा पेटता वणवा आहे. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने दुःख पुत्र आहे. राजपुत्र नव्हेच. दुःखाच्या महापुरातील सागर गाजेवर स्वार झालेला एक गर्जा महाराष्ट्र माझा म्हणणारा  दुःख धुंदार महायोध्दा आहे. म्हणून तर दस्तूरखुद्द औरंगजेब बादशहा म्हणतो

संभाचा पराक्रम म्हणजे केवळ नऊ वर्षांत एकूण 203 युद्ध लढले. एकही  हार नाही किंवा साधा तह नाही. समोर शत्रू पक्षाचे पाच साडेपाच लाख सैन्य उभे असताना केवळ ३७ हजार सैन्यबळावर मराठशाहीला दांडगा विजय प्राप्त करून देणारा हा एकमेव पृथ्वी तलावरील जागतिक किर्तीचा शुरवीर मशहूर योध्दा म्हणावे लागेल. विशेष म्हणजे एकाच युद्धात जवळ जवळ दोन लाख शत्रुंना एकटाच मृत्यु मुखी पाडणारा आणि सतत युध्द नादाची टिपरी संबळ घुमवणारा रणधुरंधर योद्धा. ज्याने ह्या आलमगीराला नऊ वर्षे रानोमाळ हिंडवल. मुघलांचे नामांकित सरदार ज्यांच्या शौर्यावर अनेक लढाया जिंकल्या , त्यांनाच ह्याने आस्मान दाखवल. माझी कैक लाखांची सेना लांबून एखाद्याने पहिली तर छातीत धडकीच भरावी. एवढं अफाट मनुष्यबळ. पण . . . ह्या संभाजीने पार वाट लावली आमच्या सैन्याची आणि आमचीही. साधी सुखाने झोप घेऊ देत नाही. आम्हास वाटलं होत संभा म्हणजे शिवाजीच्या पोटाला आलेला तख्तनशील वारीस , संभाजी म्हणजे आमच्या अकबरा सारखा व्यसनी , दुराचारी. संभाजी म्हणजे बदफैली. पण . ‌. . नाही. इंथे मात्र आमचा अंदाज साफ साफ चुकला. त्या सिवा पेक्षा दपट हा राजपुत्र अधिक तापदायक आहे. अरे त्या सीवाने माझे किल्ले जिंकले , प्रदेश जिंकला. पण . . . कधी बुऱ्हाणपूरला हात घातला नाही. पण . . . हा पट्ट्या गादीवर आला आणि सगळ्यात आधी ह्याने आमचे बुऱ्हाणपूर लुटलं. भागानगर जाळून टाकलं. कैक कोटींचा खजिना लुटला. रामशेज किल्या भोवती माझी तिस चाळीस हजारांची फौज आणि किल्ल्यावर ह्याची अवघी सहाशे माणसं. पण . . . सहा वर्षे रामशेज झुंजता ठेवला. किती खतरणाक आदमी. मी इंग्रजांना , पुर्तुगीझाना , सिद्दीला ह्याच्या विरुद्ध लढायला प्रवृत्त केलं. पण . . . हा बहादुर सगळ्यांच्या उरावर पाय देऊन नाचतोय. एखाद्या काळ भैरवा सारखा. इंग्रजांना चारीमुंड्या चित केलं , पुर्तुगीजाची तर हाडे खिळखिळी केली , जंजिऱ्याच्या सिद्दीच्या कंबरेचे माकड हाडचं मोडून काढले. ह्याने माझं कैक लाखाचं सैन्य संपवलं. माझ्या सैन्याने तर आपण कुठे मरणार. हे पण . . . गृहीत धरलं होत. मद्रास , पाषाणकोट , तंजावर , जंजिरा , प्रत्येक जागी हा व्यापून उरलाय एखाद्या काळभैरवा सारखा. हा आदमी नहीं. सैतान हैं ! जिवंत पणीची यमपूरी. आशा खतरणाक यमपूरी पेक्षा नरकपूरी कितीतरी चांगली म्हणायची वेळ. अशा माणसा बरोबर लढून तरी काय फायदा. एकही झुंज जिंकू देत नाही. म्हणजे ही किती ताजूब की बात. नाही काय ? “

 असा हा राजपुत्र ! ज्यांच्या वाट्याला मातृ प्रेम नाही. मातृ छत्र हरवलेलं. पुढे पितृ छत्रही काळाच्या आधीन झालेलं आणि हा एकाच वेळी नऊ शत्रूशी झुंजतो आहे. पण . . . महाराष्ट्राच्या दुसऱ्या छत्रपतीला , दस्तुरखुद्द छात्रपती शिवरायांच्या छाव्याला आमच्या स्वकीयांनीच रेखाटताना खूप वेगळा रेखाटला. संभाजी म्हणजे व्यसनी , बदफैली , रंगेल. पण . . . आम्ही त्यांच बलिदान विसरलो. सलग ९ वर्षे इंग्रज , पोर्तुगीझ , सिद्धी , मोघल अशा एक नाही , अनेक शत्रूशी एकाच वेळी तब्बल बारा बारा आघाड्यांवर झुंज देऊन दुश्मनांची ससेहोलपट करणारा शुरवीर संभाजी आम्ही रेखाटलाच नाही. वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत पंडित ठरलेला सात सतक , नख शिखा , बुध भुषणंकार झालेला संभाजी आम्हाला शोधताच आला नाही. दुष्काळाने पीडित रयतेला शेतसारा माफ करून बी-बियाणं पुरविणारा राजा जाणताच आला नाही. तब्बल १४० लढाया करून एकही लढाईत पराभूत न झालेला रणमर्द संभाजी इतिहासाला का कळाला नाही ? 

रामशेज सारखा सगळ्यात कमी उंचीचा पठारी किल्ला सतत सहा वर्षे कमी मनुष्य बळावर झुंझवता ठेवणारा एक झुंझार रणमर्द संभाजी कसा काय इतिहासाच्या हाती लागला नाही ? रयतेला छळणाऱ्या सिद्दीला समुद्रात कायमचा बुडवायचा चंग बांधून ८०० मीटर लांबीचा समुद्रात पूल बांधणारा एक अभियंता कसा काय दिसला नाही ? बाणांच्या वर्षावात मनुष्य हानी होऊ नये म्हणून जनावरांच्या कातडीची जॅकेट तयार करून सैन्याची काळजी वाहणारा एक रणमर्द झुंजार योध्दा इतिहासाच्या हाती न लागावे म्हणजे आमचा इतिहास किती खरा आणि किती खोटा. हे सुज्ञ वाचकांनी ठरवावे. या कादंबरीत मांडलेला इतिहासाचं खरा आणि तो सर्वानी स्विकारावा असे आमचे मत नाही. पण . ‌. . उडदा माजी काळे गोरे , काय निवडावे निवडणारे . . . इतकीचं अपेक्षा ठेवून हा मनमनस्थ गोंधळ संपविण्याच्या आधी हे सांगू इच्छितो की , जो जन्मतो तो मरतोच पण मृत्यू कसा असावा तर तो संगीता सारखा असावा. कारण एक दिवस मी लिखाण करीत असताना माझ्या ह्रदयात कसली तरी संगीताची धुन ऐकू येऊ लागली. कदाचित हा ह्रदय विकारांचा प्रकार असेल पण त्यातील संगीताची धुन आणि तिचा उत्कट भाव निश्र्चितच शब्दातीत होता. आशा संगीतात आलेला मृत्यो निश्चितच भावगंधी सोहळा असेल अन् कदाचित महाराज साहेबांनी अशाच उत्कट सोहळ्याचे दिगंतर फुलविले आहे. यानिमित्ताने आशा या तरुण सुलभ राजकुमाराला जय जय महाराष्ट्र माझा ! गर्जा महाराष्ट्र माझा ! ! या शब्दात लाल सलाम ! ! !

नरेंद्र नाईक ,‌ हिंगोली

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart