Welcome to Saptarshee Prakashan Online Book Shop!
-65%

महाराष्ट्राला अपरिचित कदंबा राजवट

200.00 70.00

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

महाराष्ट्राला अपरिचित कदंबा राजवट…
कदंबा राजवट महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाड, गोवा आणि केरळ या प्रदेशात तिचे अवशेष सापडतात. या राजवटीची स्थापना मयूर वर्मा कदंबा यांनी इसवी सन ३५० च्या आसपास वनवासी येते स्थापन केली. या राजवटीचा विस्तार वनवासी, हालसी, तळगुंड,गोवा, कराड, सांगली, कोल्हापूर,रत्नागिरी, मुंबई,नाशिक,अहमदनगर,नांदेड, हैदराबाद,सोलापूर आणि बेळगाव या परिसरात झाला. खालची येथील शिलालेखानुसार हे राज्य ९९ हजार खेड्यावर पसरले होते आणि याचे पुरावे खूप ठिकाणी सापडतात. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी व पोर्तुगीजांनी यावर संशोधन केले पण भारतीय संशोधकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. खूप दूरवरच्या प्रदेशात कदंबा राजवटीचे अवशेष विखुरलेले आहेत. त्यांची मंदिर शैली, ताम्रपट,विरघळ आणि शिलालेख हे जास्तीत जास्त कदंबा राजवटीचे आहेत.प्राचीन व मध्ययुगीन इतिहास लेखनासाठी अनेक साहित्य व शिलालेख ताम्रपट उपलब्ध आहेत. कालिदास, युवानसाँग यांच्या लिखाणात कदंबा राजवटीचा उल्लेख आणि तत्कालीन राजांची वर्णने सापडतात.
कदंबा राज्य हे धर्मशास्त्रानुसार चालणारे राज्य होते. रामायण, महाभारत आणि वेद पुराण यांच्या नितीनुसार राजा राज्यकारभार करत होता. प्रजेचे हीत हे राजाचे आद्य कर्तव्य होते. राष्ट्रप्रेम,राजाची आदर्श कर्तव्ये, सर्वांचा मान सन्मान विशेषतः स्त्रियांचा सन्मान, स्त्री शिक्षण, स्त्री सैनिक व्यावसायिक शिक्षण , शेती आणि शेतीपूरक व्यवसाय, १२ कारखान्यांची निर्मिती,जहाज बांधणी, व्यापार,ठराविक आणि नियंत्रित मोजमाप,करवसुली,भेदभाव न करणे, गरीब आणि श्रीमंत ही राष्ट्रातील सर्व मंडळी सारखीच आहेत,विद्वान साहित्यिक,कारागीर आणि कलाकार यांचा सन्मान व संरक्षण स्त्रियांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व सैन्यात भरती गुन्हेगाराला शासन कठोर असे. दुसरे लग्न म्हणजे दुःखाला निमंत्रण अशी त्यांची संकल्पना होती. रयतेचे राष्ट्रावर प्रेम होते. राजा मोहिमेवर असताना पट्टराणीने जुन्या जाणत्या जाणकारांचा सल्ला घेऊन राज्यकारभार करावा. परकीय आक्रमणे परतून लावावीत.यावेळी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार महाराणीला असत. कदंबानी वाकाटक, चालुक्य, चोल आणि पांड्या यांच्या राजवटीत अनेक कर्तबगार राजे होऊन गेले. राजा रविवर्मा, गुगल देव, भोगी वर्मन, षष्ठ, जयकेशी, परमाधिदेव इत्यादी कर्तबगार राजे झाले अनेक राजकन्याही प्रसिद्ध होत्या. ताईलू सारख्या राण्यानी कदंब एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले. अशी ही राजवट हजारो वर्ष टिकली पण तिचा इतिहास मांडायला इतिहासकार कमी पडले.सर्वात जास्त पुरावे असलेली ही कदंबा राजवट अपरिचित ठेवली गेली ती सुज्ञ विचारवंतांपुढे आणायचा एक प्रामाणिक प्रयत्न…!

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart