महाराष्ट्राला अपरिचित कदंबा राजवट
Description
प्रस्तावना।
महाराष्ट्राला कदंबा राजवटीची ओळख व्हावी, कर्तबगार राजे, राण्या, राजकुमारी यांची ओळख व्हावी आणि देशातील पहिले पुरोगामी विचार असलेली राजवट महाराष्ट्रापासून अलिप्त राहू नये कर्तबगार राजकन्या त्यांच्या विवाह जोडलेली राजघराणे त्यांनी केलेला महाराष्ट्रातील राज्य कारभार त्यांचे योगदान महाराष्ट्राला समजावे या ध्येयानेच हा ग्रंथ प्रपंच !
कदम यांची जन्मभूमी महाराष्ट्र असून कर्मभूमी देखील महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रभर राज्य असून हा इतिहास उपेक्षित राहिला. यासाठी पुरावे सत्य घटना संदर्भ देऊन केलेले हे एक इतिहास लेखन अनेक इतिहासकार कदम राजवट गोव्याची कदम्बा म्हणून ओळखत आहेत.राजकीय स्वार्थासाठी कर्नाटकने आपलेच राजे कदम असा टेंबा मिरवला. काही जणांनी तर कदम ब्राह्मण असल्याचे सांगितले. ब्राह्मण ह्या शब्दाची व्याप्ती व्यापक आहे ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण ब्राह्मण ! ही एक पदवी ब्राह्मण एक स्तुती आहे .आपल्या महत्त्वकांक्षासाठी व ब्राह्मणांचे वर्चस्व स्वाभिमान क्षत्रिय आणि अनेक वेळा नाहीसा केला आपली विद्या ही सर्वाना द्यायची सोडून, जेव्हा त्या विद्येचा दुरुपयोग होऊ लागला त्यावेळी राजांना हस्तक्षेप करावा लागला आणि ब्राह्मणत्व त्यांनी सिद्ध केले. उदाहरण द्यायचे झाले तर कृषी विश्वामित्र त्यांनी तपश्चर्या पूर्ण करू नये म्हणून किती अडथळे आणले गेले याला इतिहास साक्षीदार आहे म्हणूनच आपल्याकडे विश्वामित्र पुत्र शाकुंतल कुमार भरत याच्या नावे आपल्या भूमीला भारत हे नाव पडले आहे. बरेच ऋषीमुनी शूद्र जातीतील आहेत तरी ते ब्राह्मण आहेत ज्याने आव्हान स्वीकारले ते ज्ञानी झाले. शास्त्रज्ञ झाले त्यांना लोक ऋषीमुनी म्हणू लागले. त्यांच्या वंशजाना ब्राह्मण म्हणू लागले.आज ही काही लोक ब्राह्मणाचे गोत्र सांगतात आणि मराठी आपली आपली कुळी सांगतात. रामायण महाभारत अठरा पुराणे अशा अनेक ग्रंथातून हुशार तंत्रज्ञ संशोधक शास्त्रज्ञ झाले. त्यांना ऋषीमुनी म्हणायची प्रथा होती. ज्यांनी शोध लावले मानव कल्याण करण्यासाठीं उपयोगी झाले . त्यांना राज्यकर्त्यांनी आपल्या पदरी ठेवले त्यांना शाळा स्थापन दिल्या सल्लागार म्हणून नेमणूक झाली. ज्याने ब्रह्म जाणले ते ब्राह्मण स्वच्छ चारित्र्यवान शील जपणारा देवधर्म मानणारा देव कार्य करणारा मार्गदर्शक गुरु धर्माचे वेद पुराण जाणणारा अभ्यासक शस्त्र शास्त्र याचे शिक्षण देणारा म्हणजे शास्त्रज्ञ शास्त्र जाणकार शिक्षक आणि ह्या विद्या ज्यांनी आत्मसात केल्या त्यांना ऋषीमुनी म्हटले गेले. त्यांची आज्ञा राजा प्रजा मंत्री गण राणी मासा सेवक या सगळ्यांना शिरसावंद्य असे काही राजाने ढोंगी सत्तेला चिकटून राहणारे स्वार्थी ब्राह्मण म्हणून घेणारे यांना दूर करून स्वतःच शिक्षण घेतले. याची उदाहरणे खूप आहेत त्याच्यातील एक ब्राह्मण प्रतिपालक विश्वामित्र सातवाहन राजे यांनाही काही ग्रंथात ब्राह्मण म्हटले आहे. शिवाजी महाराजांच्या काळात राज्याभिषेकाच्या वेळी जी घोषणा दिली गेली त्याला गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं गेलं आहे. रजपूतानी कुठलातरी अर्थ लावून भोसले कुळाला रजपूत म्हणण्याचा केविलवाना प्रयत्न केला. याला कुठलाही ठोस पुरावा असेल तर मग मग महाराष्ट्रभर जे भोसले पसरलेले आहेत ते कुठून आले. आज भोसले कुळ शहाण्णव कुळी मराठा कदमांसारखेच महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. ज्यांनी आपल्या मुली पत्नी बहीण सुलतानाला देऊन त्यांच्या दावणीला बांधून राज्य व सरंजाम सांभाळणे त्यांनी मराठ्यांची तुलना करणे किंवा गोत्र कुळ आमचा कोणताही संबंध नाही मराठा म्हटलं की अगोदरच उत्तर भारतीय नाक मुरडतात. मग आमच्या शिवबाचा भोसले घराण्याचा रजपुताशी काय संबंध? हे म्हणणे सारे चुकीचे आहे. कारण शिवाजी महाराज हे मराठाच होते भोसले यांची सोयरीक वंशावळ सदाचार शिष्टाचार खानपान पोशाख शरीरयष्टी मराठमोळी आहे. त्यासाठी मध्ययुगीन काळातील इतिहासकाराने केलेल्या चुका सुधारून घेणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वज्ञ राजा होते. ते शास्त्र ब्रह्म ज्ञान माहीत असणारे होते. अनेक ग्रंथांचा अभ्यास किंवा गोष्टी घटना त्यांना माहीत होत्या. त्यांनीही ब्राह्मणांना श्रेष्ठत्वाचा दर्जा दिला ते त्यांचे गुण पाहून. त्या शिवरायांनी कृष्णाजी भास्कर सारख्या लाचाऱ्याची खांडोळी केली. हे आपण अफजल खान वधाच्या वेळी पाहिले आहे. प्रथम भारतीय संस्कृतीतील सोळा संस्कार ज्याला माहित नाहीत नाही त्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी केलेल्या मुंजीवर जाणव्यावर बोलू नये. महाराजांचे जे विवाह झाले ते मराठी मुलखातील अनेक घराणी जोडण्यासाठी झाले. रजपूत जोडण्यासाठी नव्हे. तेव्हा शिवराय हे रजपूत कुळाचा काहीही संबंध नाही हे विज्ञानवादी लोकांना का जाणून घ्यायची नाही. रजपुताना महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चव्हाण सोडलं तर गुलामगिरी करायची सवयच पडली होती बाकीचा समाज कसा गुलाम असावा याकडे रजपुतांचे लक्ष असे आणि आजही हीच मानसिकता उत्तर भारतात आहे. महाराष्ट्रातील 96 कुळी मराठा सन्माननी जगतो इतरांना जगवतो. अठरा अलुतेदार बारा बलुतेदार हे कायम त्याच्याबरोबर असतात. पण ही संकल्पना उत्तर भारतात नाही. मराठ्यांचा द्वेष करणारे त्यांचं वाईट हितचिंतनारे कानडे आहेतच त्याबरोबर बंगाली बिहारी उत्तर भारतीय अफघाणी यांनी लुटारू दरोडेखोर असेच संबोधले ! मराठ्यांना कार्य करायचे माहित आहे ते लिहून ठेवायची माहित नाही. लिहिलेले सर्व दप्तर रायगड वर जुल्फी कारखानाच्या वेढ्यात जळून गेले. तर इतिहासाला साक्ष कशी द्यायची मराठ्यांचे आराध्य दैवत तुळजाभवानी शिवशंकर आणि इथली बा संस्कृती या महाराष्ट्रात रुजली. आई आणि बाबा म्हणायची या भागातली पद्धत शेताशिवारापासून ग्रामदेवतापर्यंत सर्व आई आणि बाबा या देवता आहेत. कारण मराठी हे वे सर संस्कृतीत मोडतात ते आर्यही नाहीत आणि द्रविडही नाहीत मराठी हे सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारे प्राचीन काळापासून पुरोगामी विचाराचे आहेत ते कधीही गुलाम नाहीत. गुलामी त्यांच्यात रुजली नाही. महाराष्ट्र राजवटीने ग्रीक सिनेटला विचार करायला भाग पाडले इतकी प्रगत राजवट या महाराष्ट्राला लावली त्यांनी बौद्ध धर्म बरोबर जैन धर्माचे ही संरक्षण केले. अनेक मंदिरे स्तुप चैतगृह लेणी त्यांनी बांधले गडकोट बांधून राज्याचे संरक्षण केले. त्यात मराठ्या ंच्या अनेक कुळातील राजवंशांचा संबंध आहे. वाकाटक चालुक्य प्रतिहार राष्ट्रकूट कदंबा शिलाहार या लोकांनी येथे राज्य केले त्यांचीच अनेक घराणे येथे जहागीरदार सरंजामदार म्हणून नांदली त्यांनी जनतेचे सोने केले.धर्मांना आश्रय दिला कलेचे माहेरघर महाराष्ट्र झाले इथली कला जगभर पोचली इथला व्यापार जगभर पोचला पण उत्तर भारतीय व दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्राला कधीच सामावून घेतले नाही. त्यांची संस्कृती वेगळी ती भारतीयांना समजलीच नाही. दिलदारपणा शूर आणि धाडसी प्रवृत्ती यासाठी मराठी प्रसिद्ध त्यातीलच एक कदंबा घराणे याची ओळख ही इतिहासकाराने महाराष्ट्राला होऊ दिल नाही.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.