ट्रोलधाड
Description
ट्रोलधाड’- मर्मस्पर्शी वैचारिक अनुभूती
सिद्धहस्त लेखिका आणि दर्जेदार प्रतिभेचे मानस सरोवर ज्यांना निसर्गत:च लाभले आहे अशा सौ. वर्षा किडे-कुळकर्णी म्हणजे कल्पनाविश्वातला प्रति श्रावणच. त्यांच्या उत्तुंग चिंतन नभातून झिरपलेले शब्दामृत म्हणजे ‘ट्रोलधाड’ हा कथा संग्रह आहे. त्यातील प्रत्येक कथा वाचकांशी साधलेले हितगुज. ते साकारताना निवडक शब्द कलिकांचा सुगंध मनाला भिजवित विलक्षण वाचन तृप्ततेचा आनंद तर देतोच शिवाय परिसरात अनुभवलेल्या आठवांचे अविस्मरणीय सुखद कटू क्षणांचे मोरपीस सुखद अनुभूती देवून जाते..
उत्कंठा, औत्सुक्य क्षणाक्षणाला वाढतच जाणं हे कथा लेखिकेच कौशल्यं सौ.वर्षाताईंना अचूक साधलेले आहे. प्रत्येक कथेतील कथा अनुभवताना स्वअस्तित्वाचा विसर पडतो. नैसर्गिक, सामाजिक प्रतिमांच्या विविधरंगी फुलांनी बहरलेली ही पुष्पमाला. कथा संपल्यानंतरही कितीतरी वेळ त्यातली पात्रे मनात दरवळत राहतात. कथा साहित्याला लाभलेला हा सुंदर इंद्रधनुष्यच आहे. सर्वोत्कृष्ट प्रतिभाशक्तीचा अप्रतिम आविष्कार मनाला अतिशय आनंद देवून गेला. ‘ट्रोलधाड’ ची एकेक कथा या कमल पुष्पातील एक एक पाकळी. मनाच्या पटलावर अमीट, अक्षय सुगंध सोडून एका वेगळ्याच मनोहरी विश्वात नेवून सोडणारी किमया वर्षाताईंना सुरेख साधली आहे. आकाशवाणी, चित्रवाणी आणि महाराष्ट्रातील अनेक मंचावर कथा, कवितावाचन, वक्ता म्हणून विविध विषयांवरील रोकठोक मतप्रदर्शन याची अनुभूती नेहमीच हटके आणि वैचारिक बैठक लाभलेली राहिली आहे. ‘ट्रोलधाड’ या सर्व अनुभूतींचा कौस्तुभ असून लक्षावधी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवेलच हा मला पूर्ण विश्वास आहे. अगदी मनःपूर्वक शुभकामना!
डॉ. राजा धर्माधिकारी, परतवाडा
सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक, वऱ्हाडी कवी
फोन: ९४२२८२००९९
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.