कुळकायदा न्यायाधीकरणाच्या नजरेतून
₹490.00
- Availability : Preorder
- Author : Digmbar Raundhal
- ISBN : 978-81-950799-8
- Edition : 1
- Publishing Year : 7 JULY 2023
- Pages : 286
- Language : MARATHI
- Category : LAW
Description
कुळकायदा न्यायाधिकरणाच्या नजरेतून हे उपजिल्हाधिकारी श्री. दिगंबर रौंधळ लिखीत पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती येत आहे. न्यायाधिकरणामध्ये प्रत्यक्ष काम केलेल्या अधिका-याने तेथील अनुभव व अभ्यासाअंती पुस्तक रुपात कुळकायदा उलगडण्याचा कदाचित हा पहिलाच प्रयोग असावा. कुळकायद्याचे महत्त्वाचे न्यायनिवाडे यांची या पुस्तकात केलेली पेरणी हा कायदा अभ्यासणा-यांनाच नव्हे तर या कायद्याच्या आधारे न्यायनिर्णय देणा-यांना सुध्दा दिशादर्शक ठरेल असा मला सार्थ विश्वास वाटतो.
ओघवती भाषाशैली, महसूल विभागातील लेखकाचे अनुभव, विविध उदाहरणे, आवश्यक तिथे फरकाचे मुद्दे, वेळोवेळी कायद्यात झालेल्या सुधारणा, अद्यावत शासन निर्णय व शासन परिपत्रके, विविध न्यायिक बाबी आणि न्यायाधिकरणातील जेष्ठ विधिज्ञ यांचे न्यायाधीश व न्यायमूर्ती इत्यादींच्या समोर झालेले युक्तीवाद यांचा हे पुस्तक लिहिताना श्री. दिगंबर रौंधळ यांनी केलेला वापर या विषयातील सर्व घटकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावा असाच हा ग्रंथ आहे.
या पुस्तकामुळे शेतकरी, पक्षकार, विधी शाखेचे विद्यार्थी, विधिज्ञ, महसूल अधिकारी / कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांसाठी कुळकायदारुपी ज्ञानकोषांची कवाडे खुली होण्यास निश्चितच मदत होईल..
न्या. के.यु. चांदीवाल, अध्यक्ष
महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण
मुंबई.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.