आरोग्यदायी कुळीथ
₹30.00 ₹10.00
Description
कुळीथ म्हणजे आपल्या बोलीभाषेत हुलगा म्हणतात. आपल्या देशात जवळजवळ सगळीकडे पिकणारे आणि सहज उपलब्ध असणारी कडधान्य म्हणून कुळीथाचा उल्लेख करावा लागेल अलीकडच्या काळामध्ये आहारातील पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून कुळीथ सुपर फूड मानले जात आहे. खरंतर भारतीय जेवणामध्ये परिपूर्ण आहारात डाळी आणि कडधान्य व द्विदल धान्य हा भारतीय जेवणाचा प्रमुख घटक आहेत. परंतु आपण जेवण करताना याकडे लक्ष देत नाही. आपल आहार प्रथिने, पिष्टमय पदार्थ,स्निग्ध पदार्थ खनिज द्रव्य आणि विटामिन्सनी परिपूर्ण पाहिजे. ऋतुजा दिवेकर यांच्या डायट प्लॅनमध्ये उल्लेख करताना त्या म्हणतात “कुळीथ हे इतके पौष्टिक आहे की ते अक्षरशः सुपर फूड म्हणून गणना केली जावे” कुळीथाचे सेवन सर्दी, फ्लू किंवा अर्धशिशी यामध्ये उपयुक्त आहे.
कुळीथ (हुलगा) ही फॅबेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव डॉलिकॉस बायफ्लोरस असे आहे. कुळीथ / हुलगा , कुळथी (गु.) कुलीत (हिं.) कुलथी (क.) हुरुळी (सं.) कुलीथक (इं.) हॉर्स ग्रॅम, मद्रास ग्रॅम कुल–लेग्युमिनोजी उपकुल–पॅपिलिऑनेटी. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे.
भारतात सर्वत्र कुळिथाची लागवड करतात. आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांत कुळिथाचे पीक मोठ्या प्रमाणात काढतात.कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. पावट्याच्या वंशातील ही शिंबावंत (शेंगा येणारी) वेल उष्णकटिबंधात सामान्यपणे आढळते. अनेक शारीरिक लक्षणांत हिचे पावट्याच्या वेलीशी साम्य असले तरी काही फरक आहेत. हिची वेल वर्षायू (एक वर्ष जगणारी) असून फुले पतंगरूप, पिवळी आणि शिंबा लांब व वाकड्या असतात. त्यात पाच–सहा पिंगट, तांबूस किंवा काळ्या बिया असतात.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.