सप्तर्षी प्रकाशन शब्द शिवार च्या नवव्या अंकाचे प्रकाशन आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न
आज दि २२ ऑक्टोबर रोजी सप्तर्षी प्रकाशनच्या शब्द शिवार या दिवाळी अंकाचे प्रकाशन पनवेल विधान सभेचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना ते म्हणाले दिवाळी अंक हा मराठी भाषेला आणि संस्कृतीचा उदयोन्मुख करणारा आरसा असतो.मराठी विचारधारेचा व संस्कृतीचा जगभर प्रसार करण्याचे प्रभावशाली साधन म्हणून दिवाळी अंकाची ओळख निर्माण झाली आहे.या सदरच्या शब्द शिवार अंकामध्ये वैचारिक लेख,कथा कविता,गड किल्ले,प्रवास वर्णन,विविध साहित्यिक संग्रहाचे दर्शन घडत आहे.असे मराठी साहित्य दर्शन भारतातील काना कोपऱ्यातच नव्हे तर जगभरातील मराठी भाषा प्रेमींना घडण्या साठी सप्तर्षी प्रकाशनने यास अमेझॉन,गुगल बुक्स,सप्तर्षी डॉट इन, कोबो डॉट कॉम सारख्या विविध अंतर राष्ट्रीय वेब साईट वर व छापील स्वरूपात एकच वेळी उपलब्ध करून दिले आहे.यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध जगभरामध्ये मराठी विचार व साहित्य पोचत आहे.संपूर्ण जगभरामध्ये मराठी भाषेचा व साहित्याचा प्रचार व प्रसार सप्तर्षी प्रकाशनच्या माध्यमातून होत असल्यामुळे आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांनी प्रकाशनचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उप अधिक्षक भूमी अभिलेख सिध्देश्वर घुले,भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विनायक आवताडे,संगणक अभियंता श्रेयस नायगुडे,पार्वती रियल्टर्स व अडव्हांसड सर्वे चे दत्तात्रय घुले उपस्थित होते.
